भौगोलिक स्थान व सीमा
महाराष्ट्र राज्याच्या नकाशात चंद्रपूर जिल्हा पूर्व भागात आहे. चंद्रपूर जिल्हयाच्या पश्चिम दिशेस यवतमाळ जिल्हा आहे. उत्तरेस वर्धा,नागपूर व भंडारा हे जिल्हे आहेत. पूर्व दिशेला गडचिरोली जिल्हा आहे तर दक्षिणेस आंध्रप्रदेश राज्य आहे.


भौगोलिक रचना
वर्धा नदीच्या खो-याचा बहुतेक भाग सपाट मैदानाचा आहे. जिल्हयात मुल-चिमूर टेकडया आहेत.पेरजागड व चांदूरगड डोंगर आहेत. भूरुपाच्या उंचसखलपणावरुन प्राक़तीक रचना
समजते. जिल्हयाचे प्राक़तीक रचनेनुसार तीन विभाग पडतात.
प्राक़तीक विभाग
      मूल-चिमूर टेकडयांचा प्रदेश:- मूल-चिमूर गावांजवळील टेकडया त्या गावांच्या नावांवरुन ओळखल्या जातात. या प्रदेशात पेरजागड डोंगरही आहे. या प्रदेशात वरोरा,भद्रावती,नागभीड व मूल या तालुक्यांचा समावेश होतो.
      वर्धा-वैनगंगा नदयांचे सखल मैदान:- चंद्रपूर जिल्हयाचा बहुतेक भाग या मैदानी प्रदेशात येतो. वर्धा व वैनगंगा नदया आणि त्यांच्या उपनदयामुळे हा प्रदेश सपाट व सुपीक बनला आहे.
      चांदुरगडचा डोंगराळ प्रदेश :- चांदुरगडचा डोंगराळ भाग जिल्हयात नैऋत्श्‌ेय आहे. या प्रदेशात जिवती,राजुरा,कोरपना तालुक्यांचा काही भाग येतो.

 

DISCLAIMER
The website contents are provided by respective sections/dept.  from Collector Office, Chandrapur.
NIC will not be responsible for any information that may be incorrect.
Designed & Developed by National Informatics Center (NIC), Chandrapur.